बालभारती । ट्रेलर रिव्हिव्ह


 बालभारती 


                       खरं सांगायच ठरलं तर "बालभारती" हे चित्रपटाचं नाव पाहिल्यावर लहानपण आणि महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद शाळा डोळ्यापुढून जाते. महत्वाचं म्हणजे हे नाव पाहून मी ट्रेलर पाहण्याचं ठरवलं. 

          आता चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल बोलायचं झालं तर खूप वर्ष्यानंतर मी या पद्धतीचा विषय मराठी चित्रपट सृष्टीत पाहत आहे. जस काहीसा अंदाज. नाव पाहून तुम्हालाही आलाच असावा कि चित्रपटाचा नेमका विषय हा काय असेल. तर जे तुम्हाला आणि मला अपेक्षित आहे तोच हा विषय आहे. इंग्रजी कि मराठी ? आणि या ट्रेलर मध्ये वाटतेकी हा चित्रपट या विषयाला खूप पुढे घेऊन जात आहे. कारण हे कि यात फक्त इंग्रजी आणि मराठी वर वाद नसून. बौद्धिक द्रुष्ट्या हुशार आणि कर्तृत्वान असलेल्या व्यक्तीसाठी भाषा गरजेची असते का ?. असा सिव्हाच्या गर्जने सारखा प्रश्न विचारणारा हा चित्रपट आहे.

                         सिद्धार्त जाधव यांचा मुलगा खूप हुशार आहे. तो घरात आणि बाहेर वेग-वेगळे वैज्ञानिक प्रयोग करत असतो. पण तो मराठी शाळेतील एक मराठी भाषिक विध्यार्थी आहे. त्याच्या कडे खूप काही करण्याचे कर्तृत्व आहे. परंतु काही लोक हे सिद्धार्त ला म्हणजे त्याच्या वडिलांना त्याला इंग्लिश शाळेत टाकण्याचा सल्ला देतात. खरतर हाच या चित्रपटाचा विषय असावा असं मला वाटत. परंतु मी वर जस म्हटलं कि यात खूप विषय घेण्यात आलेले आहेत. आता पाहायला गेलं तर तो इंग्लिश शाळेत सर्वात ढ विध्यार्थी म्हणून मानला जातो आणि त्यानंतर भाषा एका अश्या कर्तृत्ववान विद्यार्थ्याला त्याच्या कर्तृत्वा पेक्ष्या हि मी महान आहे असच जणू सांगते. परिणामी तो भाषे पुढे हारून जातो. पण चित्रपटात या पुढे काय दाखवतात हे महत्वाचं ठरणार आहे.

                चित्रीकरणाबद्दल बोलायचं झाल्यास ते अतिशय उत्तम आहे. संगीत सुद्धा खूप सुंदर आहे. आणि महत्वाचं म्हणजे विषय खूप छान निवडला आहे. हा चित्रपट पाहणारा व्यक्ती आपल्या मातृभाषेशी आजून घट्ट जोडला जाईल असं मला वाटत.

आपण जर आपल्या मातृभाषेवर प्रेम करत असाल तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहायला हवा... 


ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/watch?v=ZK0ZB_DwfvM

Comments