Posts

Showing posts from November, 2022

बालभारती । ट्रेलर रिव्हिव्ह

Image
  बालभारती                          खरं सांगायच ठरलं तर "बालभारती" हे चित्रपटाचं नाव पाहिल्यावर लहानपण आणि महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद शाळा डोळ्यापुढून जाते. महत्वाचं म्हणजे हे नाव पाहून मी ट्रेलर पाहण्याचं ठरवलं.            आता चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल बोलायचं झालं तर खूप वर्ष्यानंतर मी या पद्धतीचा विषय मराठी चित्रपट सृष्टीत पाहत आहे. जस काहीसा अंदाज. नाव पाहून तुम्हालाही आलाच असावा कि चित्रपटाचा नेमका विषय हा काय असेल. तर जे तुम्हाला आणि मला अपेक्षित आहे तोच हा विषय आहे. इंग्रजी कि मराठी ? आणि या ट्रेलर मध्ये वाटतेकी हा चित्रपट या विषयाला खूप पुढे घेऊन जात आहे. कारण हे कि यात फक्त इंग्रजी आणि मराठी वर वाद नसून. बौद्धिक द्रुष्ट्या हुशार आणि कर्तृत्वान असलेल्या व्यक्तीसाठी भाषा गरजेची असते का ?. असा सिव्हाच्या गर्जने सारखा प्रश्न विचारणारा हा चित्रपट आहे.                          सिद्धार्त जाधव यांचा मुलगा खूप हुशार आहे...